वाडेगावमधील वाॅर्ड क्रमांक ४ चे मतदान केंद्र हे जि. प. कन्या शाळेत दोन केंद्रावर होते. त्याच केंद्रावर इतर वाॅर्डाचे मतदान केंद्र असते. तसेच वाॅर्ड क्रमांक ५चे मतदान केंद्र हे उर्दू शाळा येथे आहे. येथील अंदाजे ३०० ते ५०० मतदार वास्तव्यास आहेत. इंदिरानगर हे उर्दू शाळा मतदान केंद्रापासून फेऱ्याने ६ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच त्या ठिकाहून बाजारातून येणाऱ्या रस्त्यात पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे. परिणामी फेऱ्याने येणाऱ्या मतदारांचा खर्च स्वतः करावा लागत होता किंवा काही उमेदवारांना करावा लागत होता. हा खर्च सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नव्हता म्हणून मतदारांच्या सोईनुसार हे मतदान केंद्र इंदिरानगर येथे सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील मनोहर सोनटक्के, श्यामलाल लोध, सचिन तिडके, संजय तायडे, नितेश जाधव, कुलदीप जंजाळ आदींनी निवेदनातून केली हाेती. त्यानुसार मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले.
..............
निवडणूक आयोगाकडून इंदिरानगर वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये दोन मतदान केंद्र दिल्याने मतदारांचा त्रास वाचला.
मनोहर सोनटक्के, ग्रामस्थ, वाडेगाव