शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अखेर उड्डाण पुलाच्या पायाभरणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 14:10 IST

अकोला : जेल चौक ते माऊंट कारमेल हायस्कूलपर्यंत विस्तारित होत असलेल्या अकोल्यातील उड्डाण पुलाच्या पायाभरणीस शुक्रवारी रात्री मध्यरात्री सुरुवात झाली.

अकोला : जेल चौक ते माऊंट कारमेल हायस्कूलपर्यंत विस्तारित होत असलेल्या अकोल्यातील उड्डाण पुलाच्या पायाभरणीस शुक्रवारी रात्री मध्यरात्री सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जयपूरच्या तज्ज्ञ चमूने शुक्रवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर काँक्रिटीकरणास हिरवी झेंडी दिली. त्यानंतर कंपनीने शुक्रवारी मध्यरात्री तातडीने सुरुवात करण्यात आली.गेल्या चार वर्षांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या साडेतीन किलोमीटर अंतराच्या उड्डाण पुलाच्या कामास मार्चमध्येच सुरुवात झाली. १६३.९६ कोटींच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा कंत्राट हरियाणा हिस्सार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतल्यानंतर मार्च महिन्यात सॉइल टेस्टिंगचे नमुने घेतले. त्यानंतर उड्डाण पुलाच्या मार्गात येत असलेल्या भागातील वृक्ष आणि पथदिवे हटविण्याची परवानगी महापालिका प्रशासनास मागितली; मात्र ही परवानगी वेळेच्या आत न मिळाल्याने कंपनीने आहे त्या परिस्थितीत काम सुरू केले. मध्यवर्ती कारागृहासमोर आली पेट्रोल पंपाशेजारी दोन ठिकाणी उड्डाण पुलाच्या पिल्लर उभारणीसाठी खोदकाम सुरू केले. जेलसमोरील आणि पेट्रोल पंप शेजारील बलाढ्य पिल्लरची लोखंड बांधणीदेखील कंपनीने करून घेतली; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतिम परवानगी देणाºया चमूची पाहणी झाली नव्हती. दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीचा सर्व्हे न केल्याने पुढील कामकाज करणे थांबले होते. शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जयपूरच्या तज्ज्ञ चमूने पिल्लरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पुढील बांधकामास हिरवी झेंडी दाखविली. या चमूत अरविंद कुमार, मुरारी बाबू, अमरावती येथील टीम लीडर तनपुरे, अकोला येथील प्रकल्प अधिकारी सुहास भिडे येथे प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी बांधकामाची परवानगी मिळताच शुक्रवारी मध्यरात्री कंपनीने पेट्रोल पंपाजवळील लोखंड बांधलेल्या पिल्लरची पायाभरणी सुरू केली. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू झालेले हे बांधकाम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खडकी येथील प्लांटवरून काँक्रिट मटेरियल आणून या पिल्लरमध्ये टाकले गेले. बहुप्रतीक्षित अशा महत्त्वाकांक्षी उड्डाण पुलाच्या बांधकामास शुक्रवारी एकदाची सुरुवात झाली. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग