शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:13 IST

विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे सरपंचांनी केली होती. त्याचा राग मनात धरून सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देगुन्हा मागे घेण्यासाठी काँग्रेसचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे सरपंचांनी केली होती. त्याचा राग मनात धरून सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे आणि परिसरातील गावातील सरपंच आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या दिला आहे. प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून सरपंच आणि संबंधित महिलांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दुपारी चार वाजल्यापासून हे ठिय्या आंदोलन सुरू असून, रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते.  जांब येथील सरपंचांनी सदर महिला ह्या देशी दारूच्या अवैध विक्रीचा व्यवसाय करत असून, या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी स्थानिक पोलिसात ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली, याचा राग मनात ठेवून संबंधित महिलांनी रविवारी सकाळी सरपंचास ईल शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशा आशयाची तक्रार सरपंच संजय सोनुने यांनी पोलिसात दिली आहे. दहा डिसेंबर रोजी तक्रारकर्त्या महिलांपैकी एकीचा घरासमोरून जात असताना संजय किसन सोनुने यांनी हात धरला तथा ईल हावभाव करत विनयभंग केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच आ. राहुल बोंद्रे, रिझवान सौदागर, प्रभाकर वाघ, देवीदास सुसर, परिसरातील विविध गावाचे सरपंच व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात धडकले.

तक्रारकर्त्या महिलांवर देशी दारू विक्रीचे गुन्हे  दाखल आहेत आणि सरपंचांनी दारू विक्रीवर बंदी आणण्यासाठी निवेदन दिले म्हणून त्यांच्याविरुद्ध महिलांनी ही तक्रार दिली. जोवर सरपंचावरील दाखल गुन्हे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार- राहुल बोंद्रे, आमदार, चिखली

पोलिसांनी दोन्ही बाजूची तक्रार ऐकून त्यांची नोंद घेत गुन्हे दाखल केले आहे.- बी.बी. महामुनीपोलीस उपविभागीय अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत