शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:54 IST

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

अकोला: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी व हिंदू-मुस्लीम दंगल भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून त्यांना अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात तक्रार अर्ज सादर करून त्यांनी ही मागणी केली. यावेळी निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण टाले पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. सुधीर ढोणे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, अर्णब रंजन गोस्वामी यांचे दि. 21/04/2020 रोजी रिपकब्लक चॅनलद्वारे प्रसारित होणा-या "पूछता है भारत" या जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 117, 120 व 153, 153 ब, 295अ, 298, 500, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी. सदरचे जाहीर कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्या बाबत मानहानीकारक वक्तव्ये करून अर्णब गोस्वामी यांनी तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच याच कार्यक्रमात त्यांनी हिंदू-मुस्लीम दंगल होईल अशा प्रकारचे भावना भडकविणारी वक्तव्ये जाणीवपूर्वक केलेली आहेत. त्यामुळे धार्मिक भावना भडकविणे व जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सदर अर्णब गोस्वामी हे नेहमीच अशा प्रकारची बदनामीकारक तसेच दोन समाजात भांडणे/दंगली होतील अशा प्रकारची वक्तव्ये करीत असतात. सबब वरील प्रकाराची तात्काळ चौकशी करून अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. तक्रार अर्जावर डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह अशोकराव अमानकर, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण टाले पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.
टॅग्स :Akolaअकोलाarnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस