शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:42 IST

एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला.

अकोला : कोरोना योद्धा म्हणून लोकांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचे आवाहन करताना स्वत:च पॉझिटिव्ह निघालो. दुर्दैवी बाब म्हणजे याच वेळी टायफाइड आणि काविळ या दोन्ही आजारांनी मला ग्रासले होते. त्यामुळे आपली रोगप्रतीकारकशक्ती साथ देईल की नाही, ही भीती होती; पण डॉक्टरांचे प्रयत्न आणि सहकार्यांच्या प्रार्थनेमुळे मृत्युुच्या दाढेतून परतलो, हे सांगत असताना अकोलेकरांनो अजूनही वेळ गेली नाही, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन कोरोनाबाधित एका पोलीस कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना केले.अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरुन पोलीस कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र हे करत असताना पोलीस कर्मचाºयानांच कोरोनाची लागण होत आहे. अशाच एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढाईसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रामदासपेठ पोलीस ठाण्यातील ५६ वर्षीय कर्मचारी हे ड्युटीवर असताना त्यांना अचानक ताप आला. डॉक्टरांकडे गेल्यावर समजले की, टायफाइड आणि काविळ या दोन्ही आजारांनी मला ग्रासले होते. त्यामुळे थकवा आला होता; मात्र अशातच कोरोनाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. टायफाइड आणि काविळसोबतच आता कोरोनाचीही लागण झाल्याने मनातील भीती वाढू लागली होती. रोगप्रतीकारकशक्ति कमी झाल्यामुळे चिंता वाढली होती; पण कुटुंबीयांनी धीर दिला. पोलीस सहकाऱ्यांनीदेखील आत्मबळ वाढविले. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचे बळ मिळाले. शिवाय, सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी उत्तम काळजी घेतल्याने कोरोनातून लवकर बरा झालो; पण ही लढाई एवढी सोपी नव्हती. कोरोना हा आजार मानसिक खच्चीकरण करणारा आजार आहे. हा आजार कोणालाही होऊ नये, असे कोरोनातून पूर्णत: बरे झालेल्या पोलीस कर्मचाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले.-कोरोना योद्धा म्हणून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अनेकांनी ऐकले, तर काहींनी दुर्लक्ष केले. अकोलेकरांनो, परिस्थिती भयावह होत चालली आहे. आतातरी कोरोनाला हलक्यात घेऊ नका. नियमांचे पालन करा.- पोलीस कर्मचारी, रामदासपेठ पोलीस ठाणे, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAkolaअकोलाPoliceपोलिस