शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:22 IST

विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार  साहित्य संमेलन १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स  स्कूल परिसर, अकोला येथे पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य  आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित  पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ अकोला शाखे द्वारा आयोजन१ व २ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल परिसर होणार साहित्य संमेलन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार  साहित्य संमेलन १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स  स्कूल परिसर, अकोला येथे पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य  आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित  पत्रकार परिषदेत दिली. १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता भाषा गौरव दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल.  भाषा गौरव दिंडीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, लोकसाहित्य ही  मुख्य संकल्पना घेऊन सहभागी होतील. सकाळी १0.३0 वाजता अखिल भारतीय  बालकुमार साहित्य संमेलन पुण्याच्या नियोजित अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते  संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष बाल साहित्यिक शंकर कर्‍हाडे यांच्यासह  मुंबई येथील डबिंग व सिनेकलावंत मेघना एरंडे-जोशी, स्वागताध्यक्ष प्रा. ललित  काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यानंतर सिनेकलावंत मेघना एरंडे-जोशी  यांची प्रकट मुलाखत विद्यार्थी अनुष्का जोशी, मेहरा मिरगे, सई देशमुख व साहि ित्यक मोहिनी मोडक या मेघना एरंडे यांची मुलाखती घेतील. दुपारी ३.३0 वाजता  शकुंतलाबाई ओंकारराव मालोकार स्मृती सर्मपित बालक-पालक (मला काहीतरी  सांगायचे) या विषयावर परिसंवाद  होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय  व्याख्याते सचिन बुरघाटे हे राहतील. या परिसंवादात विविध जिल्ह्यांमधील बाल प्र ितनिधी सहभागी होणार असून, त्यामध्ये सानिका जुमळे अकोला, तनुश्री दखने  गोंदिया, मृणाल भालेराव चंद्रपूर, मैत्रेयी लांजेवार बुलडाणा, प्रियंका चव्हाण  वाशिम, सिया शेटे ठाणे यांचा समावेश राहील. सायंकाळी कॅम्प फायर होईल.  व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, बाल समुपदेशक डॉ. प्रदीप अवचार व वर्‍हाडी  साहित्यिक किशोर बळी मनोरंजन करतील. २ डिसेंबर रोजी गप्पा-टप्पा कवयित्रीशी, वंचित मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,  स्व. प्रमिलाताई जैन स्मृती सर्मपित कथाकथन ज्येष्ठ बाल साहित्यिक प्रा. पद्मा  मांडवगणे यांच्या अध्यक्षतेखाली बाल कथाकार उर्वी खडके अमरावती, कल्याणी  देशमुख नागपूर, खुशी कालापाड वाशिम, सिद्धार्थ घुगलिया यवतमाळ, अमिता  ठोसर अकोला व जान्हवी गोरे बुलडाणा या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. दु पारी जागर मराठी कवितांचा हा सांस्कृतिक वाद्यवृंद कार्यक्रम राहील. दुपारी ३.३0  वाजता साहित्यिक तथा उपजिल्हाधिकारी राजेख खवले यांच्या प्रमुख उपस्थितीत  संमेलनाचा समारोप होईल, असेही नारे यांनी सांगितले. याप्रसंगी विदर्भ साहित्य  संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.