शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ कुचकामी ठरल्याने शिक्षकांच्या आॅनलाइन वेतनाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:25 IST

शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे.

अकोला: शालेय शिक्षण विभागाचे कामकाज आॅनलाईन होत असताना, अकोला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन वेतन आॅफलाइन करण्यात येत आहे. शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे.शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. आॅनलाइन वेतन देण्याची व्यवस्था करण्यासाठी शालार्थ सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले होते. सॉफ्टवेअर सुरळीत सुरू असताना, शिक्षण विभागाने हे सॉफ्टवेअर अपडेड करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शालार्थचे सॉफ्टवेअरच सुरू झाले नाही. वर्ष उलटले तरी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिकी दुरुस्तीचे कामच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सॉफ्टवेअर नादुरुस्त असल्याने, शिक्षण विभागाची शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे वर्षभरापासून शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन मिळण्याऐवजी ८ ते १0 तारखेला वेतन मिळत आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत शिक्षण विभागसुद्धा अनभिज्ञ आहे. शिक्षक संघटनांनी, शालार्थ प्रणालीची सॉफ्टवेअर दुरुस्त होवो किंवा न होवो, शिक्षकांचे वेतन मात्र शिक्षण विभागाने वेळेत आणि नियमित द्यावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)पोषण आहाराचे अनुदानही झाले आॅफलाइन!शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराचे अनुदान यापूर्वी शिक्षकांच्या खात्यात आॅनलाइन पद्धतीने जमा करण्यात यायचे; मात्र आता हे आॅनलाइन अनुदान बंद करून आॅफलाइन देण्यात येत आहे. त्यात चार महिन्यांपासून शाळांचे पोषण आहाराचे अनुदान रखडले आहे. 

वर्षभरापासून शालार्थ प्रणालीचा बोजवारा उडाला आहे. दर महिन्याला शिक्षकांचे वेतन उशिरा होते. कोणत्या महिन्यात १५ तारखेला वेतन होते. शिक्षक परिषदेने अनेकदा निवेदने दिले तरी शालार्थ सॉफ्टवेअरचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.- श्याम कुलट, कार्याध्यक्षराज्य शिक्षक परिषद

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक