शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शेतकऱ्याने घरीच बनविले खत पेरणी यंंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 10:12 IST

खत पेरणी यंत्राचा हा जुगाड टेक्नॉलॉजीचा प्रयोग शेतीकरिता फायदेशीर ठरत आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: खारपाणपट्ट्यातील एका शेतकºयाने पिकांच्या वाढीकरिता घरीच खत पेरणी यंत्र तयार केले आहे. सध्या या खत पेरणी यंत्राची उपयोगिता पाहून अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा हा यशस्वी प्रयोग करणे सुरू केले आहे. त्यामुळे खत पेरणी यंत्राचा हा जुगाड टेक्नॉलॉजीचा प्रयोग शेतीकरिता फायदेशीर ठरत आहे.खारपाणपट्ट्यातील देवरी येथील हरिभाऊ वाघोडे यांच्याकडे २५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शेती व्यवसायाला वाहून घेतले आहे. खारपाणपट्ट्यात शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस न आल्यास हंगामातीत पीक हाताखालचे जाऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. दुसरीकडे पिकांना खत देण्यासाठी मजुरीचा खर्च येतो; परंतु शेतामध्ये मजूर खत फेकतात. त्यामुळे खत पिकाच्या मुळाशी पोहोचत नाही. पर्यायाने बाष्पीभवन होते तर पाऊस झाल्यास खत वाहून जाते, अशा मन:स्थितीत लॉकडाऊनमध्ये एक दिवस हरिभाऊ वाघोडे हे घरी बसलेले असताना त्यांना घरात तेलाची निकामी कॅन दिसली. त्या कॅनवरून त्यांना खत पेरणी यंत्र करण्याची कल्पना सुचली. त्यांनी घरीच वखराला लावण्यासाठी १५ लीटर तेलाची निकामी कॅनची खतपेटी केली. त्याला दोन होल करून वखराला फिटिंग केली. वखराला पेरणी यंत्राचे दाते लावले. केवळ अडीच हजारांचे साहित्य व वेल्डिंग मजुरीचा त्यांना खर्च आला. वाघोडे यांनी खत पेरणी यंत्राचा प्रत्यक्ष शेतीवर प्रयोग केला असता तो यशस्वी ठरला. शेतात या खत पेरणीमुळे कपाशीच्या मुळाशी थेट ४-६ इंच खोल खत पोहोचते. वाघोडे यांनी शेतात कपाशी लागवड केली आहे. या पिकास १०० टक्के खत मिळत असल्याने कपाशीची वाढ होते आहे. या घरगुती बनावटीमुळे मजुरीची बचत झाली. कामाला गती आली. एकावेळी १० एकराला एक मजूर एक बैलजोडीद्वारे योग्य पद्धतीने खत देऊ शकतो.पेरणी पट्ट्या पद्धतीने केली असल्याने खताची योग्य मात्रा मिळाल्याने १७ जून रोजी पेरणी केलेल्या कपाशीचे झाड, फांद्याची उंची ४ फूट झाली आहे. खारपाणपट्ट्यात शेतीमध्ये अभिनव प्रयोग त्यांनी केले आहेत. खारपाणपट्ट्यातील जमिनीचा पोत, पावसाचे प्रमाण नोंद घेत त्यांनी शेतीची पेरणी कशा पद्धतीने करावी, याबाबत केलेल्या प्रयोगाची डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ यांनीसुद्धा दखल घेतली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी