शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्ति सन्मान; श्रमिक पत्रकार संघातर्फे महिला पत्रकारांचा कार्यगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:11 IST

सामाजिक बदलासाठी झटणाऱ्या नारीशक्तिचा मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव करण्यात आला.

अकाेला : घरातला पुरुष हा पुरुष म्हणून नव्हे; तर माणूस म्हणून वावरताे, तेव्हाच महिलांचे भविष्य उज्वल होते. समाजाला आज स्त्री किंवा पुरुष नको, तर माणूस हवा आहे. त्यामुळे माणुसकीची बिजे पेरत सर्वांनी सोबत चालायला हवे, असे मार्मिक आवाहन लेखिका-निवेदिता प्रा. सीमा रोठे यांनी रविवारी, ८ मार्चला केले. अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित नारीशक्ती सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. तोष्णीवाल लेआऊटमधील प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात हा अनाेखा सोहळा पार पडला. माध्यमांमध्ये परिणामकारक आणि निर्भिडपणे काम करून सामाजिक बदलासाठी झटणाऱ्या नारीशक्तिचा मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर अर्चना जयंत मसने अािण जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार प्रामुख्याने उपस्थित हाेत्या.  प्रा. रोठे पुढे म्हणाल्या, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्यारुपाने आज माध्यमांचा राजकीय नेत्यांवर वचक कायम अाहे. यात महिला पत्रकारांचेही मोठे योगदान असून, समाजामध्ये वावरताना महिला आणि पुरुषांनी सहभावनेने वावरण्याची गरज असल्याचे प्रा. रोठे यांनी सांगितले. पत्रकारिच्या माध्यमातून विविध प्रश्नांना प्रामाणिकपणे वाचा फोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे विशाल बोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अाभार प्रबोध देशपांडे यांनी  मानले. पत्रकार संघाचे सदस्य सचिन देशपांडे आणि सुगत खाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  नारीशक्तिचा गाैरवनारीशक्ती सन्मान सोहळ्यात नेहा खत्री, निलम तिवारी, संगिता पातूरकर, डाॅ. निशाली पंचगाम, हर्षदा सोनोने, पूजा  काळे, प्रियंका जाधव, किरण निलखन, रुपल शुक्ल, करुणा भांडारकर, जया भारती, अॅड. नीलिमा शिंगणे या  महिला पत्रकारांचा यावेळी स्मृतीचिन्ह, ग्राम गिता, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या महिला कर्मचारी सिंधू गांधे अािण अर्चना चेटूले यांचाही महिला िदनी पत्रकार संघातर्फे गाैरव करण्यात अाला.  

‘घरातच शिकविला जावा संस्कार’महिलांचा सन्मान महिलांसह कुटुंबीतील सर्वच सदस्यांकडून घरातच शिकविला जाणे गरजेचे आहे. याशिवाय महिलांनीच परस्परांविषयी द्वेषभाव न ठेवता आपल्या सुरक्षेसाठी संघटित राहण्याची आज गरज आहे, असे मत िज.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी व्यक्त केले.  ‘कमीपणा, भीती बाळगू नये’विविध क्षेत्रात महिला आज प्रभावीपणे काम करीत आहेत. ही अभिमानास्पद बाब असून, महिलांनी कोणत्याही क्षेत्रात वावरताना कमीपणा किंवा भीती बाळगू नये तर आपल्या सुरक्षेसाठी एकत्र राहिले पाहिजे, असे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन