शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीए’ करणार रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:46 IST

अकोला : रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर पडणार आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

- प्रवीण खेतेअकोला : रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर पडणार आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.कुठल्याही खाद्य पदार्थाची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून तसा परवाना मिळविणे बंधनकारक आहे; मात्र राज्यात सर्वत्र रस्त्यावर विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असले, तरी त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. शिवाय, यातील बहुतांश विक्रेत्यांना नियमावलीचे ज्ञानदेखील नसल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती पाहता अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येणार असून, विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.उघड्यावर अन्न शिजवण्यास परवानगी नाहीनागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर अन्न शिजवण्यास परवानगी नाही; पण राज्यात सर्रास उघड्यावर अन्न पदार्थ शिजवून त्याची विक्री केली जाते. तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीला परवानगी असली, तरी अशाही पदार्थांची विक्री नियमांना डावलून केली जात आहे.ग्राहकांमध्येही हवी जनजागृतीअन्न व औषध प्रशासनातर्फे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे; मात्र त्यानंतरही खाद्यपदार्थ विक्रेत्याने नियमांची अंमलबजावणी केली नाही, तर ग्राहकांनी तक्रार कशी करावी, कोणाकडे करावी, यासंदर्भात संबंधित दुकानातच जनजागृतीचे फलक लावण्याची गरज आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याच्या उद्देशानं रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाºया सर्वच खाद्यपदार्थ विक्रेत्याने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवाय, या विक्रेत्यांना मार्गदर्शनही करण्यात येईल.- लोभसिंग राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग