शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने केली तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या; आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:35 IST

पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले.

ठळक मुद्देही धक्कादायक घटना पातुर शहरातील गहिलोत नगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. मयुरी गोपाल बेलुलकर असे मृत मुलीचे नाव आहे.पातुर पोलिसांनी आरोपी बाप गोपाल बेलुलकर (३०) याला ताब्यात घेतले.

पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. ही धक्कादायक घटना पातुर शहरातील गहिलोत नगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. मयुरी गोपाल बेलुलकर असे मृत मुलीचे नाव आहे. पातुर पोलिसांनी आरोपी बाप गोपाल बेलुलकर (३०) याला ताब्यात घेतले असून, जखमी आई व पुतणी यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पातुर शहरातील विश्रामगृहाजवळच्या गहिलोत नगरात गोपाल शंकर बेलुलकर हा राहतो. सोमवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास त्याने कौटुंबिक कलहातून तीन वर्षीय मुलगी मयुरी बेलुलकर हिचा गळा दाबून खुन केला व तीचा मृतदेह घराबाहेर फेकून दिला. यावेळी त्याने घरातच झोपलेल्या त्याची आई शंकुतला बेलुलकर यांना घरामागे साप निघाल्याचे सांगून झोपेतून उठविले आणि हातपाय बांधून मारहाण केली. हा प्रकार पाहुन त्याच्या घरात राहत असलेल्या त्याच्या मोठ्या भावाची मुलगी गायत्री बाबुराव बेलुलकर (१५) ही जागी झाली. गोपालने गायत्री हीच्यावरही नॉनचॉपरने हल्ला केला. यावेळी आईने आरडा-ओरड केल्याने शेजारी धावून आले. शेजारी आल्याचे पाहून गोपालने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. गोपालने पोलिसांसमोर कबुली दिली असून, हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेली त्याची आई शकुंतला बेलुलकर व पुतणी गायत्री बेलुलकर यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पातुर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरCrime Newsगुन्हेगारी