अकोला: किरकोळ वादातून वडिलांनी मुलास मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खदान परिसरातील मुल्लानी चौकात राहणारा शेख लुकमान शेख शमी (३६) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील शेख शमी शेख दाऊद यांनी घर खाली करून देण्याच्या कारणावरून त्याच्यासोबत वाद घातला आणि तू आमच्याकडे राहायचे नाही, असे म्हणून लोखंडी पाईपने मारहाण केली. मारहाणीत शेख लुकमान गंभीर जखमी झाला. त्याच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी भादंवि कलम ३२६, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.
वडिलाने केली मुलास मारहाण
By admin | Updated: June 4, 2014 22:04 IST