शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:02 IST

तेल्हारा येथील शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.

ठळक मुद्देतेल्हारा व भांबेरीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा येथील जिजामाता नगरात राहणार्‍या पुष्पा घ्यार या शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून तिच्या राहत्या घरात नाटेला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने  घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनादेखील १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.तेल्हारा शहराच्या जिजामाता नगरातील रहिवासी पुष्पा नथ्थूजी घ्यार या ५0 वर्षीय  शेतकरी महिलेने सततची नापिकी व थकीत कर्जास कंटाळून तिच्या राहत्या घरात  १४ नोव्हेंबरच्या सकाळपुर्वी कधीतरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या  शेजारी असणारे मंगेश लाहोडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बराच वेळ होऊनही  पुष्पाबाईने घराचे दार न उघडल्याने त्यांच्या घराच्या दरवाजामधून आत बघितले,  तेव्हा त्यांना पुष्पाबाईने घरात नाटेला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे  आढळून आले. या घटनेबाबत हरिदास इंगोले यांनी तेल्हारा पोलिसांत फिर्याद दिली.  त्याची तातडीने दखल घेऊन ठाणेदार सचिंद्र शिंदे, उपनिरीक्षक नागोराव भांगे यांनी  घटनास्थळी पोहोचून चौकशी केली व पंचनामा केला. सदर महिलेच्या नावाने तीन  एकर शेती असून, तिच्या अंगावर १५ हजार रुपयांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या तेल्हारा शाखेचे कर्ज आहे. तसेच काही हजारांचे खासगी कर्जदेखील  आहे. सदर महिलेचे पती हे शेतमजुरी करतात. मृतक शेतकरी महिलेच्या पश्‍चात प ती, एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.  तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत भांबेरी येथील गजानन रामराव तायडे या ३५ वर्षीय  शेतमजुराने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची १४ नोव्हेंबर  रोजी उघडकीस आली. या घटनेबाबतची फिर्याद देवीदास किसन तायडे यांनी १४  नोव्हेंबर रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून तेल्हारा पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्या पश्‍चात  पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  जानराव सोळंके करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू