शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना फटके हाणल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणार नाही!- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 14:36 IST

केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत.

- विलास बोरचाटे निंबा : केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी शेतक-यांनी पेटून उठले पाहिजे. शेतक-यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मंत्र्यांना मारले तर पोलीस तुमचे काहीही करू शकत नाही. तुमच्यामुळे भाजप सत्तेत आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निंबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक एकनाथ दुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, बाळापूर तालुकाध्यक्ष श्रीकांत खरप, स्वाभिमानीचे नेते प्रा. प्रकाश पोफळे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा इंगोले, अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी शासनाला असा अल्टिमेटम दिला. कापूस, सोयाबीनला भाव मिळाला नाही, तर  १९ आॅक्टोबरनंतर विदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. विदर्भातील शेतक-यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन एकही चाक फिरू देऊ नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करावा, कापूस, सोयाबीनला उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार रुपये द्यावेत, आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे मांडल्या आहेत. असे सांगत, खासदार शेट्टी यांनी शासनाने सात लाख टन पामतेल विदेशातून आयात केले.अंबानी, अदानींसारख्या उद्योजकांचे या शासनाला भले करायचे आहे. भाजपाचे शासन शेतक-यांचे नसून, उद्योजकांचे आहे, असा आरोप करीत त्यांनी सोयाबीनचे भाव शासनाने पाडल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन रवी मनसुटे यांनी केले. यावेळी इ. पहिलीतील विद्यार्थिनी विधी मनसुटे हिने शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. 

शेतक-यांनो, मंत्र्यांना फिरू देऊ नका - तुपकर

‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने सत्ता लाटली. त्यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. कापूस, सोयाबीनचे भाव पाडण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या एकाही मंत्र्याला फिरू देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. खासदार शेट्टी यांनी आदेश दिला, तर शेतक-यांच्या हितासाठी एखाद्या मंत्र्याचा मुडदा पाडायलासुद्धा आपण मागे-पुढे पाहणार नाही. आता शेतक-यांनी पेटून उठण्याची गरज आहे, असे मत तुपकर यांनी मांडले. उद्योजक एकनाथ दुधे यांनीसुद्धा विचार व्यक्त केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी