शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:01 IST

शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत.

अकोला: प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्ष वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यासाठी या योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतक-यांच्या नोंदणीसाठी शिबिरे (कॅम्प) घेऊन, लाभार्थी शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतक-यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ ऑगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र शेतक-यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सेतू) लाभार्थी शेतक-यांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतक-यांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार आहे.शेतक-यांना भराव्या लागणा-या विमा हप्त्याच्या रकमेत ५० टक्के रक्कम शासनामार्फत भरण्यात येणार आहे आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतक-यांना प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतक-यांची नोंदणी करण्यासाठी शिबिरे (कॅम्प) घेऊन, पात्र लाभार्थी शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना १६ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतक-यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना