शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल विकू नये - सहकार,पणन व वस्त्राद्योग मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:20 IST

अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले .

ठळक मुद्देशासकीय तूर खरेदी केंद्राचे अकोल्यात उद्घाटन. एकरी ३.५६ क्विंटल  तूर खरेदी करणार. आधारभूत दर व बोनस मिळून प्रति क्विंटल  ५,५०० रू पये मिळणार.

अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीत बाजार जिनींग प्रेसिंग फॅक्टरी आवार येथे किमान आधारभूत दरानुसार तुर खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, माजी सहकार मंत्री वसंतराव धोत्रे , अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, सहकार विभागाचे उपनिबंधक गोपाल माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.सहकार मंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी किमंत येत असेल व आर्थिक गरज असेल तर शासनाच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा व आपला माल काही दिवसासाठी तारण ठेवून योग्य बाजारभाव प्राप्त झाल्यावर विक्रीस काढावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. राज्यात कालपासून नाफेड व्दारे तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करून आपला माल विक्रीस आणावा असे सांगून सहकार मंत्री देशमूख पुढे म्हणाले, आवश्यकता वाटल्यास व शेतक-यांची मागणी असल्यास नवीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. व्यापारांनी शेतक-यांचा माल खरेदी करतांना हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये. व शेतक-यांना योग्य बाजारभाव मिळवून देऊन त्यांना सहाकार्य करावे असेही सहकार मंत्री देशमूख म्हणाले.अकोला कृषी उत्पन्न समितीच्या आवारात तुर खरेदीसाठी तीन वजनकाटे लावले आहेत. सहकार मंत्र्यांच्याहस्ते चिंचोली रूद्रायणी येथील शेतकरी रोशन विलास घोरड यांच्या तुरीचे वजन माप करण्यात आले. यावेळी रोशन घोरड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी सहकार मंत्र्यांनी वजनकाटयाचे पुजन केले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी , अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.गुरू वारी पाठवले मेसेजशुक्रवारी तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने महाराष्टÑ स्टेट मार्केटिंग फेंडरेशनच्यावतीने गुरू वारी शेतकºयांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते.खरेदीचा पहिला दिवस असल्याने केवळ ४० क्विंटल   तूर विक्रीसाठी आली होती. सोमवारी यामध्ये वाढ होईल. दरम्यान,शासकीय तूर खरेदी केंद्रावर आता ३.५६ क्विंटल   तूर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी १२ टक्के ओलावा व इतर प्रतवारीचे निकष आहेतच.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीSubhash Deshmukhसुभाष देशमुख