कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:16 PM2018-02-02T16:16:58+5:302018-02-02T16:19:39+5:30

अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.

No eligible farmers should be deprived from debt waiver - Subhash Deshmukh | कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

Next
ठळक मुद्देसुभाष देशमुख यांनी अकोल्यात सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले सन २००९ नंतरच्या पात्र थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी. या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्री. उमाळे, लेखा परिक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक आर.जी. घुमरे, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, जिल्हा विपणन अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच अधिकारी, खरेदी विक्री संघाचे सचिव उपस्थित होते.
देशमुख यांनी सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीला जिल्हयात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याची माहिती जाणून घेतली. अद्याप ज्या पात्र शेतकº्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकºयांना प्राधान्याने लाभ द्यावा, तसेच सन २००९ नंतर जे थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यांची नोंद घ्या, त्यांचे आॅनलाईन अर्ज भरुन घ्या. एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित ठेवू नका, असे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी विकास सहकारी संस्था सर्वच गावांमध्ये स्थापन करुन शेतकºयांना सभासद करुन घ्यावे. त्यांना वेळेवर लाभांश द्यावा. वंचित राहिलेल्या शेतकºयांचा खातेउतारा तलाठयांकडून घेऊन त्यांना सभासद करुन घ्यावे. या संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना अन्य व्यवसायासाठी पतपुरवठा करावा, असेही देशमुख म्हणाले.
अवैध सावकारीवर नियंत्रणासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाई करावी, असे सांगून ते म्हणाले की, खरेदीसाठी नोंदणी झालेल्या उडिदाची खरेदी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच तूर खरेदीसाठी पातूर व पिंजर येथेही खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतची सूचना त्यांनी यावेळी केली.
 

Web Title: No eligible farmers should be deprived from debt waiver - Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.