शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:47 IST

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध ...

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच या योजनांबददल त्यांना अधिकाऱ्यां मार्फत सविस्तर मार्गदर्शन करणे. प्रगतीशील शेतकºयांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे तसेच शेतकरी आणि संबधित विभागांचे अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एक दिवस शेतकऱ्यां सोबत असा प्रशासनाचा मानस असून दर बुधवारी शेतकऱ्यां करीता याबाबतची कार्यशाळा नियोजन भवनात राहणार आहे, याचा शेतकऱ्यां नी लाभ घेऊन स्वत: रोजगारक्षम शेती करुन स्मार्ट उदयोजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी केले.रोजगारक्षम शेती व्यवसाय या अंतर्गत ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणिया, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ठाकरे, रेशीम अधिकारी श्री. मानकर यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांच्या हितासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतीसोबत शेतकऱ्यां ची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रोजगारक्षम शेती व्यवसाय या सदराखाली जिल्हयातील शेतकºयांना आता स्मार्ट उद्योजक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यां करीता साप्ताहिक मुक्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतकरी स्वत:च स्वयंभू झाला पाहिजे, हा या मागील उदेश आहे. या कार्यशाळेत कृषी, बँक, नाबार्डचे अधिकारी तसेच प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन शेतकºयांना मिळणार आहे. दर बुधवारी ही कार्यशाळा नियोजन सभागृहात राहणार असून शेतकऱ्यां मध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच शेतकºयांना उदयोजक बनविण्याचा या मागे हेतू आहे. या कार्यशाळेत मुक्त संवादाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अडचणी मांडू शकतात.मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरणप्रारंभी जमीन आरोग्य पत्रिकांचे प्रातिनिधीक स्वरुपात शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये प्रकाश घोडस्कर, सूर्यभान इंगळे, गजानन घोंगे, मनोहर बाबर, विष्णु सोनाग्रे, गणेश घोडस्कर, जनार्दन नांदुरकर, वसंत सोनाग्रे यांचा समावेश होता. जागतिक मृदा दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन निकम यांनी यावेळी केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्यासह तराणिया, कुलकर्णी, वाळके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मृदा चाचणी अधिकारी मिनल म्हस्के, यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक नंदू वानखेडे व मंडळ अधिकारी बोडखे यांनी केले तर निकम यांनी आभार मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयFarmerशेतकरी