शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या संकटातही शेतकऱ्यांनी विकला आठ कोटींचा भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:55 IST

६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला, फळ उत्पादक शेतकºयांसमोर संकट उभे झाले होते; परंतु या संकटातही शेतकºयांनी मार्ग शोधत गट तयार करून ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री केली. ६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. अकोला जिल्ह्यात आत्मामार्फत शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. गटातील शेतकºयांनी शहरातील नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात भाजीपाला उत्पादक शेतकºयांचे ६९ गट तयार करण्यात आले. या शेतकºयांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर, परराज्यातही भाजीपाला पाठविला. जिल्ह्यात विशेषत: नागरी भागात ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरू केले. गटातील शेतकºयांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाइलवर आॅर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त आॅर्डरनुसार, मालाचे पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच माल पोहोचण्याचे काम हे शेतकरी करीत आहेत. यासाठी अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो आॅनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर करण्यात येत आहे. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रीतसर माल मोजून ग्राहकांना दिला जातो. थेट ग्राहक विक्रीतून शेतकºयांची व्यापारी, अडते, वाहतूकदार, कमिशन एजंट यांच्या कचाट्यातून मुक्तता झाली. ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला विकून शेतकरी गटांना नफाच झाला. थेट ग्राहकापर्यंत भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, शेतकºयांचा वाहतूक खर्चही वाचला. संचारबंदीच्या काळात या शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विभागीय तुलना केल्यास अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे.  

तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेली विक्रीअकोला तालुक्यात ५३ शेतकरी गटांनी २६ विक्री केंद्रांमधून ९२.२० मेट्रिक टन माल विक्री केला. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ गटांनी १० केंद्रांमधून ७८.५० मे. टन माल विक्री केला. बार्शीटाकळी तालुक्यात ४३ गटांनी १४ विक्री केंद्रांमधून ६३.२० मे. टन माल विक्री केला. अकोट तालुक्यात ३७  गट १५ विक्री केंद्रांमधून ७५.६० मे. टन मालाची विक्री करू शकले. तेल्हारा तालुक्यात ३६ गटांनी १४ केंद्रांवर आपला ६९.८५ मे., टन माल विक्री केला. पातूर तालुक्यात ४० गटांनी ११ विक्री केंद्रांवर ६९.६० मे. टन माल विक्री केला. बाळापूर तालुक्यात ३८ गटांनी १४ केंद्रांवर ६४.८५ मे. टन मालाची विक्री केली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या