अकोला : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्या सोयाबीन बियाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी तयारी केली आहे. शेतकर्यांकडे ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पिके हातून गेली. पिकांचे उत्पादन बुडाल्यासोबतच बिजोत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी सोयाबीन बियाणे मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होणार आहे. येत्या खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनानुसार,जिल्ह्यातील सातही तालुक्यांत २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी सोयाबीन पेरणीकरिता एकूण १ लाख ७६ हजार २५0 क्विंटल बियाणे लागणार आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात जिल्ह्यात ८९ हजार ८८८ क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. उर्वरित ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्या सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी तयारी केली आहे. या तयारीमध्ये घरी तयार केलेले ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्यांकडे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांकडे ८६ हजार क्विंटलवर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याने, बाजारात बियाणे कमी उपलब्ध होणार असले तरी कमी पडणारे बियाणे शेतकर्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या निर्माण होणार्या टंचाईचा सामना करण्यासाठी शेतकर्यांनीच तयारी केल्याचे चित्र आहे.
सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी शेतक-यांची तयारी
By admin | Updated: May 18, 2015 01:28 IST