शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

अकोला जिल्ह्यातील कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:06 IST

लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.

- प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: भाववाढीच्या उद्देशाने घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता; मात्र तेल्हारा येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची थट्टा सुरू असल्याचे चित्र आहे. कापूस खरेदीसाठी लावलेले निकष शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहेत. दर्जेदार नसल्याचे कारण समोर अनेक शेतकºयांचा कापूस परत करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.सीसीआय केंद्रावर राज्य शासन राज्य पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत कापूस खरेदी करीत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांची संख्या तीन हजाराच्यावर आहे. अगोदरच उशिरा सुरू झालेली खरेदी व त्यात लॉकडाउन सुरू असल्याने सुरुवातीला १५ व नंतर ३० शेतकºयांना केंद्र्रावर कापूस विक्रीकरिता बोलावत आहे. अनेक दिवसांपासून घरात पडलेला कापूस काही प्रमाणात डागी झाला किंवा थोड्याफार प्रमाणात मागील वेचणीचा कापूस ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये आला तर केंद्रावरून पूर्ण ट्रॉली परत पाठविण्यात येत आहे. शेतकºयांनी आपआपल्या परीने घरात किंवा गोडावूनमध्ये कापूस भरून ठेवला असताना केंद्रावर आणलेला कापूस केंद्रप्रमुख या ना त्या कारणाने परत पाठवित आहेत. असाच प्रकार शेतकºयांसोबत शुक्रवारी घडला. शेतकºयांचा आक्रोश बघता तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बाजार समितीचे सभापती, संचालक, सहायक निबंधकचे कर्मचारी खरेदी केंद्रावर पोहोचले होते. १४ मेपर्यंत केवळ ३११ शेतकºयांचा कापूस मोजला गेल्याची माहिती मिळाली असून, ३ हजाराच्यावर किंवा जवळपास असलेल्या शेतकºयांचा कापूस केव्हा मोजल्या जाईल व त्याचे पैसे केव्हा मिळतील,असा प्रश्न आहे. प्रतीक्षा करूनही जर कापूस खरेदी केला नाही तर काय करायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कापसाची अवस्था बघता शासनाची ही खरेदी जगू देत नाही अन् मरू पण देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापसाचा पेरा करणार नसल्याचे चित्र आहे.शेतकºयांचे नियोजन बिघडले कापूस विकून शेतकरी खरिपाचे नियोजन करतात. यावर्षी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. तसेच व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने शेतकºयांचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगाम काही आठवड्यावर आला असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

मी कापूस खरेदी ही शासनाच्या निकषानुसार करीत आहे. निकषात बसत नसलेला कापूस नाइलाजास्तव परत पाठविल्या जात आहे.-जगन्नाथ बोंडे,ग्रेडर, तेल्हारा.

 

टॅग्स :Telharaतेल्हाराAkolaअकोलाFarmerशेतकरी