खामगाव : पंचायत समिती उपसभापतीच लग्न म्हटलं की, डोळ्य़ासमोर मोठा थाटमाट आणि भव्यदिव्य कार्यक्रम डोळ्य़ासमोर उभा राहतो.. पण थाटामाटाला आणि लग्नातील अवाजवी खर्चाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेऊन या खर्चातून शेतकरी आत्महत्याग्रस्त २0 कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेऊन युवा पिढीतील राजकारण्यांसाठी आदर्श ठेवला आहे. खामगाव तालुक्यातील अटाळी गणाचे प्रतिनिधीत्व करणारे व पंचायत समितीचे उपसभापती चैतन्य पाटील यांचे १३ फेब्रुवारीला लग्न आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार्या चैतन्य पाटील यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विदर्भात यवतमाळनंतर सर्वाधिक आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय घरी निघाला तेव्हा लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेत त्यांनी मुलीकडील कुटुंबालाही यासाठी प्रवृत्त केले आणि मुलीकडच्या मंडळींनीही त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास होकार दिला. शेगाव येथे पल्लवी देविदास उन्हाळे यांच्यासमवेत त्यांचे लग्न होत असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी २0 कुटुंबांना ते प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत देणार आहेत. या कार्यासाठी आपल्याला वडील स्व. रामराव लक्ष्मणराव पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे उपसभापती पाटील यांनी सांगितले.
लग्नाच्या खर्चातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
By admin | Updated: January 26, 2016 02:19 IST