शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाअभावी थकबाकीदार शेतकरी संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:28 IST

अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली. मात्र यासंदर्भात शासनाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांना प्राप्त झाला नाही.

संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकºयांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. त्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासनाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांना प्राप्त झाला नाही. शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नसल्याने, कर्जमाफी योजनेंतर्गत ३० जून २०१६ नंतर ३० जून २०१७ पर्यंत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच!येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याकरिता गतवर्षी (२०१७) पीक बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. तसेच नवीन कर्जासाठी गतवर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केल्यास, कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यां समोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना