अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात मदत वाटपाबाबत बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शेतकरी आत्महत्यांची ३१ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. केवळ १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, १२ प्रकरणांमध्ये फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय समितीच्या सभेत एकूण ५६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातल्या कट्यार येथील बाळकृष्ण सूर्यभान तेलगोटे, पळसो खुर्द येथील कैलास सुखदेव सरदार, अंबिकापूर येथील गोपाल सहदेव मामनकर, दहीगाव गावंडे येथील रुपेश पंजाबराव प्रांजळे, बोरगाव मंजू येथील शिशुपाल लालसिंग पवार, उगवा येथील मधुकर श्रीराम पवार, पातूर तालुक्यातल्या चरणगाव येथील राधा अरुण देशमुख, मळसूर येथील आत्माराम नारायण पायधन, आकोट तालुक्यातील अडगाव येथील उत्तम मारोती पटके, तेल्हारा तालुक्यातल्या बोरव्हा येथील रमेश सीताराम भिलावेकर, टाकळी येथील आनंदा रामदास गवई, बाळापूर तालुक्यातल्या अंदुरा येथील गजानन जनार्दन पाटील आणि मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील सुरेश पुरुषोत्तम रडके इत्यादी १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित ३१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, १२ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत सुमारे ५६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.
शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र
By admin | Updated: June 4, 2014 22:03 IST