शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जमाफीत शेतकरी याद्यांची पडताळणी रेंगाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:10 IST

शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ११ हजार कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी तलाठ्यांकडून करण्यात आली; मात्र १० हजार १०० शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासन निर्णयानुसार विदर्भ-मराठाड्यातील शेतकºयांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा कार्यक्रम सहकार विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गत नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या. कर्जदार शेतकरी सातबाराधारक आहेत की नाही, कोणी नोकरीवर आहे काय, पेन्शनधारक आहेत काय, यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या संबंधित तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. ११ हजार शेतकºयांच्या याद्यांपैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्यात आली असली तरी, उर्वरित १० हजार १०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहे. शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी रेंगाळल्याने कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

११ हजार शेतकºयांचे १५ कोटींचे कर्ज होणार माफ!सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांचे १५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. कर्जदार शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी मात्र रेंगाळली आहे.सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जदार ११ हजार शेतकºयांच्या याद्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी पडताळणी करण्यात आलेल्या ९०० शेतकºयांच्या याद्या प्राप्त झाल्या असून, उर्वरित शेतकरी याद्यांची पडताळणी अद्याप प्रलंबित आहे.-डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी