शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून; घर खर्च, पीक कर्ज भरणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:56 IST

शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये, त्यातून हा प्रसार वाढू नये, यासाठीची काळजी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तंूची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे; पण शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका सुरुवातीला मूग, उडीद पिकाला बसल्याने या दोन्ही पिकांचे उत्पादन घटले. सोयाबीन, कापूस पिकाला अति पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा घटला. सतत पाऊस सुरू राहिल्याने कापसाची प्रतही घटली. ही झीज भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली; परंतु पेरणीला उशीर झाल्याने हरभºयाचे उत्पादन घटले. अवकाळी पावसाचाही फटका बसला. परिणामी, गहू, भाजीपाला, फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यातून शेतकºयांची आर्थिक घडी सुधारणे अशक्य असतानाच, कोरोनारू पी नवीन संकटाने जगालाच वेठीस धरले आहे. परिणामी, शासनाला कठोर पावले उचलावी लागत असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २१ मार्चपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. तोपर्यंत हरभरा ३,५०० आणि तूर सरासरी ३,५०० क्ंिवटल आवक सुरू होती. तसेच सोयाबीनची आवक ही १५० क्ंिवटलवर होती. तथापि, आजमितीस सर्व शासकीय शेतमाल खरेदी केंद्र बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, धान्याचे व्यवहार सुरू आहेत. सध्या गहू, हरभरा काढणी सुरू असून, तूरही शेतकºयांकडे पडून आहे; परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू नसून, बाजार समित्यांमध्येही खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. येथे केवळ धान्य, डाळी, कांदा आणि बटाटा विक्री सुरू आहे. हरभरा खरेदीसाठीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने हक्काची बाजार समिती शेतकºयांचा आधार आहे. तथापि, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद ठेवला आहे.

 कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठीच संचारबंदी लावली आहे. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. जीवनावश्यक वस्तू, धान्य, कांदा आणि बटाटा विक्रीचे व्यवहार सुरू आहेत; पण लोकांनी गर्दी करू नये.- शिरीश धोत्रे,सभापती,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी