शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:33 IST

हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे.

ठळक मुद्देखोदकाम करीत असताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतात मातीचा ढीग चे ढीग लावण्यात येत आहेत. हजारो ब्रास माती थेट शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने पेरणीपूर्व मशागतीचे काम कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. माजी आमदार गव्हाणकर यांनी निंबा फाटा ते आडसुल पर्यंत या जमेची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे. यामुळे शेतात जाण्याचा रस्ता बंद पडल्याने उन्हाळ्यात करण्यात येणारी शेती मशागतीची कामे ठप्प पडल्याने शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांचा हा प्रश्न निर्माण झाल्याने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कामाची पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्या या विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार गव्हाणकरांनी शेतकऱ्यांना दिले.  रस्त्याचे जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम करीत असताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतात मातीचा ढीग चे ढीग लावण्यात येत आहेत. हजारो ब्रास माती थेट शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने पेरणीपूर्व मशागतीचे काम कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ही समस्या अंदूरा येथील शेतकरी संजय घंगाळे यांनी माजी आमदार गव्हाणकर यांना सांगून शासनदरबारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. माजी आमदार गव्हाणकर यांनी निंबा फाटा ते आडसुल पर्यंत या जमेची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी २०० शेतकरी हजर होते.   अंदुरा येथील शेतकरी संजय घंगाळे यांचे शेत अंदुरा ते निंबा फाटा मार्गावर असून यांच्या शेतातील झाडाची कत्तल करण्यात आली. तसेच त्यांच्या शेतात माती टाकण्यात आल्याने लाख मोलाची शेतजमिनीची नासधूस करण्यात आली. याप्रकारामुळे रस्त्याच्या कडेने शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी निंबा फाटा येथे एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी संतापलेले असतांना संबधित अधिकाऱ्यांनी या कामाची साधी पाहनीही जेली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे. अंदूरा ते कारंजा मार्गावर पानकास नदीवर पुर आल्यावर शेतात पाणी जात असल्याने रस्त्याच्या उंचीनेच सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता. आता यावेळी या सिमेंट रस्त्याच्या बाजूने उंच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी उंच रस्ता तयार झाल्यास दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी थांबून शेती मोठ्या प्रमाणात खरडून जाणार आहे. ही समस्या शेतकऱ्यांनी माजी आमदार गव्हाणकर यांना शेतकऱ्यांनी सांगितली. यावेळी संजय घंगाळे, राजेंद्र बेंडे, गजानन चितोडे, रुपेश आहिर, संजय अग्रवाल, अक्षय नागोलकर,  प्रमोद रोहनकार, प्रशांत बेंडे, पवन विंचू, मुकुंद कुलकर्णी, सहदेव भोजने, अविनाश बोरवार, गणेश भोजने, रामकृष्ण बोरवार, यांच्यासह शेतकरी हजर होते.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटkhamgaonखामगावFarmerशेतकरी