शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उलटले ५५ दिवस; पण मिळाले नाही तूर, हरभऱ्याचे अनुदान; १२ लाखावर शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:23 IST

शासनाकडून जाहीर करण्यात आलेले तूर व हरभरा अनुदानाचा लाभ मिळणार केव्हा, याबाबत राज्यातील १२ लाख २० हजार तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

ठळक मुद्दे५५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही.राज्यातील १२ लाख २० हजार तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

- संतोष येलकर

अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय गत ५ जून रोजी शासनामार्फत घेण्यात आला. ५५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. त्यामुळे शासनाकडून जाहीर करण्यात आलेले तूर व हरभरा अनुदानाचा लाभ मिळणार केव्हा, याबाबत राज्यातील १२ लाख २० हजार तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदीत खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने, राज्यात तूर व हरभरा खरेदी संथ गतीने करण्यात आली तसेच खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करण्यात आली होती. त्यामुळे तूर व हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना तूर, हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागत असतानाच ,‘नाफेड ’ मार्फत राज्यात गत १५ मेपासून तूर खरेदी आणि १३ जूनपासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी बंद करण्यात आल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी केलेल्या १२ लाख २० हजार ६८४ शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी रखडली. त्यानुषंगाने नोंदणी केलेल्या परंतु, खरेदी बाकी असलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टर मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय गत ५ जून रोजी शासनामार्फत घेण्यात आला. तूर व हरभरा अनुदान वाटप करण्याचा निर्णय होऊन, ५५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर, हरभऱ्याचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे तूर व हरभरा अनुदानाची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत राज्यातील १२ लाख २० हजार ६२४ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.खरीप पेरणीसाठीही कामी आले नाही अनुदान !नाफेडमार्फत तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान खरीप पेरणीचा खर्च भागविण्याच्या कामात पडेल, अशी अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत होती ; मात्र खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, अद्यापही अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या पदरात पडली नाही.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी