शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:42 IST

अकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही

- संतोष येलकरअकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांसमोर खरीप पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने थकबाकीदार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसून, कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित शेतकºयांकडून पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, संबंधित थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.१.३१ लाख शेतकºयांना कर्जमाफी!शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ३१० शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; परंतु २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या मात्र अद्याप थकबाकीदार असलेल्या ९७ हजार शेतकºयांना अद्याप कर्जमाफी मिळाली नसून, पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने, यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे.पुनर्गठन केव्हा होणार?२०१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरू शकत नाहीत. त्यानुषंगाने नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी शासनामार्फत पीक कर्जाचे पुनर्गठन केव्हा होणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरी