शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:34 IST

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही.थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही थकबाकीदार शेतकºयांची अशीच परिस्थिती आहे.३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय गत २८ जून २०१७ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. तसेच थकबाकीदार संबंधित शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा करीत, संबंधित थकबाकीदार शेतकºयांकडून पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे गत दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय उरला नाही. तोंडावर आलेल्या खरीप पेरणीसह गरजेनुसार इतर खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’साठी शेतकरी पैसा आणणार कोठून ?दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही. थकबाकीदार शेतकरी एकरकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतात; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नसल्याने, थकबाकीदार शेतकरी ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पैसा आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.अकोला जिल्ह्यात असे आहेत थकबाकीदार शेतकरी!वर्ष                         शेतकरी२०१६-१७             ७५,०००२०१७-१८             २२,०००.........................................एकूण                     ९७,०००थकबाकीदार शेतकºयांनी कर्जासाठी सावकारांकडे जाऊ नये. एक रकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत थकीत कर्जाची परतफेड करून, नवीन पीक कर्ज घेतले पाहिजे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज