शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:13 IST

निंबा फाटा (अकोला) : जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी डोंगरगाव शेतशिवारात घडली.

ठळक मुद्देदयाराम तुळशीराम सुलताने (५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. आरोपी संतोष रामचंद्र पांडे व सुनील संतोष पांडे या बाप-लेकास अटक केली आहे.

निंबा फाटा (अकोला) : जुन्या वैमनस्यातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी डोंगरगाव शेतशिवारात घडली. दयाराम तुळशीराम सुलताने (५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी उरळ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी संतोष रामचंद्र पांडे व सुनील संतोष पांडे या बाप-लेकास अटक केली आहे.डोंगरगाव येथील दयाराम सुलताने हे २२ आॅक्टोबर रोजी आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रभर ते घरी परतले नसल्याने सुलताने यांचा मुलगा आणि भाऊ त्यांना शोधण्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी शेतात गेले. शोध घेत असताना त्यांना बाजूलाच असलेल्या ठाकरे यांच्या विहिरीत दयाराम सुलताने पडलेले आढळले. त्यांना बाहेर काढले असता त्यांच्या अंगावर कुऱ्हाड आणि धारदार शस्त्राने वार केलेले आढळले. त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झालेला होता. याप्रकरणी उरळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास करून संतोष रामचंद्र पांडे आणि सुनील संतोष पांडे यांना अटक केली. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून