शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

केवळ प्रमाणपत्र; कर्जमाफीचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:59 IST

शेतकºयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानाने कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, या शेतकºयांना दोन वर्षांपासून प्रत्यक्ष लाभच मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- अशोक घाटे  लोकमत न्यूज नेटवर्कअडगाव बु. : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्ज माफीच्या या योजनेची अंमलबजावणी करताना जिल्हा स्तरावर कार्यक्रम घेऊन काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात अडगाव बु. येथील चार शेतकºयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानाने कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, या शेतकºयांना दोन वर्षांपासून प्रत्यक्ष लाभच मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अडगाव परिसरातील इतर अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षांपूर्वी शासनाने कर्जमाफीची घोषणा करून मोठा गाजावाजा करून शेतकºयांना कर्जमुक्ती झाल्याचे प्रमाणपत्र वितरित केले होते. १८ आॅक्टोबर २०१७ रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, डीडीआर, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांंचा पती-पत्नीसह साडी-चोळी व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला होता. यात अडगाव बु. येथील चार शेतकºयांचासद्धा सत्कार करून तुमची दिवाळी आनंदात जाईल, असे म्हटले होते. प्रमोद नारायण ताठे, अनिल मधुकर मानकर, राजेश लक्ष्मण सोनटक्के, विनायक काशीराम मालगे या शेतकºयांना प्रमाणपत्र मिळाले होते. अडगाव बु. परिसरातील गावांना कृषी कर्ज पुरवठा करणाºया स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया व सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या सभासद शेतकºयांना कर्जमाफीनंतरही नव्याने कर्ज पुरवठा झाला नाही. सोसायटीच्या ७५० पैकी पात्र असलेल्या ६०७ मधून केवळ ३११ शेतकºयांना कर्जमाफी मिळाली. यातील २९६ शेतकरी आजपर्यंतही त्रुटीमध्ये अडकल्याने त्यांना नव्याने कर्ज पुरवठा करता येत नसल्याची माहिती अध्यक्ष फाफट यांनी दिली. त्रुटीत अडकलेल्या १४५० शेतकºयांचे कर्ज प्रकरण क्लीयर होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला कर्ज पुरवठा देऊ शकत नसल्याची माहिती बँक देत आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु यात काही त्रुट्या निघाल्या किंवा पात्र कर्जधारक शेतकºयांना चौकशीकरिता कोणत्याही प्रकारची वेगळी यंत्रणा तयार ठेवली नाही. गावस्तरापासून राज्यस्तरापर्यंत आजही कर्ज प्रकरणाबाबत कोणतीही माहिती संबंधित शेतक ºयाने किंवा संस्थेने विचारली तर आम्ही आपला प्रस्ताव वर पाठविला आहे, एवढेच चाकोरीबद्ध उत्तर दिल्या जाते, तेही फक्त तोंडीच. यामुळेच स्थानिक सोसायटीच्या ७५० कर्जदार सभासद शेतकºयांपैकी फक्त २३ शेतकरीच सन २०१९/२० करिता नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत.अटी, त्रुटींमध्ये अडकली कर्जमाफीनियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना शासनाने प्रोत्साहनपर पंधरा ते पंचवीस हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते; परंतु स्थानिक सोसायटीच्या ३३ शेतकºयांनी नियमित कर्ज भरणा केला. त्यापैकी फक्त १४ शेतकºयांनाच लाभ मिळाला. पात्र सभासद शेतकºयांना अजूनपर्यंत का कर्जमाफी दिल्या गेली नाही, याकरिता शासनाने स्वतंत्रपणे यंत्रणा उभी करून हा गुंता सोडवावा.- मनोहरलाल फाफट, अध्यक्ष सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी अडगाव बु..१८ आॅक्टोबर २०१७ मध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझा व माझ्या पत्नीचा साडी-चोळी, ड्रेस व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री ना.रणजित पाटील यांनी सत्कार केला, तसेच कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. दोन वर्षांपासून मला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. एवढेच काय आम्हाला सोसायटी निलचा दाखलाही देत नाही.- अनिल मधुकर मानकर, सत्कार झालेले शेतकरी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी