शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ठिबक, तुषार अनुदानापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:10 IST

अकोला : ठिबक, तुषार योजनेसाठी जिल्हय़ातील पात्र शे तकर्‍यांनी मे ते जुलै महिन्यातच ऑनलाइन नोंदणी करू न संच  खरेदी केले आहेत. त्यावेळी मूल्यवर्धीत कर (वॅट) होता; पण  कृषी विभागाने त्या शेतकर्‍यांना आता वस्तू व सेवा कराप्रमाणे  (जीएसटी)शेतकर्‍यांकडून बिले मागितली जात असल्याने  जिल्हय़ातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.  

ठळक मुद्देवॅटने खरेदी, पण लावला जीएसटीकृषी विभागाचा हेकेखोर पणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ठिबक, तुषार योजनेसाठी जिल्हय़ातील पात्र शे तकर्‍यांनी मे ते जुलै महिन्यातच ऑनलाइन नोंदणी करू न संच  खरेदी केले आहेत. त्यावेळी मूल्यवर्धीत कर (वॅट) होता; पण  कृषी विभागाने त्या शेतकर्‍यांना आता वस्तू व सेवा कराप्रमाणे  (जीएसटी)शेतकर्‍यांकडून बिले मागितली जात असल्याने  जिल्हय़ातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.  सध्याची नापिकी, बाजारात पडलेले शेतमालाचे दर याने शेतकरी  प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला असताना कृषी विभागाने मात्र  शेतकर्‍यांची परीक्षा घेणे सुरू  केले असल्याचा आरोप शेतकरी  वर्गातून केला जात आहे.पाण्याचा सूक्ष्म वापर होण्यासाठी केंद्र शासनाने गत १५ वर्षांपूर्वी  सूक्ष्म सिंचन योजना सुरू  केली. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना  अनुदानावर ठिबक व तुषार संच दिले जातात. अल्पभूधारक शे तकर्‍यांना ५५ ते ५ एकरावरील शेतकर्‍यांना हे ४५ टक्के अनुदान  असते. अलिकडच्या दोन,चार वर्षात शेतकर्‍यांना आनलाइन  अर्ज सादर करू न, खरेदीची पूर्व संमती घ्यावी लागते. या भागातील शेतकरी मे महिन्यापासून पूर्वहंगामी कापूस व इतर  पिके घेतात, त्यासाठी पाण्याची गरज असते म्हणून, सूक्ष्म  सिंचनाद्वारे पाणी पिकांना दिले जाते. त्यामुळे जिल्हय़ातील ८0  टक्केच्यावर शेतकर्‍यांनी मे ते जुलै महिन्यातच ठिबक, तुषारचे  संच खरेदी केले. त्यावेळी वॅट करप्रणाली होती. जुलैनंतर  जीएसटी प्रणाली लागू झाली; पण शेतकर्‍यांनी त्यावेळची वॅटची  बिले सादर केली; पण अकोला जिल्हा अधीक्षक कृषी  अधिकारी ही बिले घेण्याचे नाकारत असल्याचा आरोप शेतकरी  करीत आहेत. अकोला जिल्हय़ात १२00 शेच्यावर शेतकर्‍यांचे  यामुळे अनुदान रखडले आहे.असाच  मुद्दा राज्यात उपस्थित झाला; पण तेथील कृषी अधीक्षक  जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी हा मुद्दा निकालात काढला; पण  अकोला येथील जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी मानायलाच  तयार नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यासंदर्भात शेतकरी  संघटना, लोकजागर संघटनांनी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची  भेट घेऊन त्यांना निवेदने दिली; परंतु अद्याप यावर तोडगा  निघाला नसल्याने शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे त.

कृषी सहसंचालकांचा आदेश पुणे कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन व कृषी सहसंचालकांनी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांना पत्र पाठवून १  मे ते ३१ जुलैपर्यंतची बिले वॅटप्रमाणे स्वीकारण्यासाठीचे पत्र  पाठविले आहे; पण कृषी अधीक्षक जुमानायलाच तयार नाही,  असाही आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे.

ठिबक, तुषार संचाचे भरपूर पैसे आलेले आहेत. २0१६-१७  मध्ये संच खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांना नियमानुसार येत्या १५  दिवसात रक्कम अदा केली जाणार आहे. यासाठीच २८ ऑ क्टोबर रोजी अकोला जिल्हय़ाचा दौरा करू न शेतकरी, कृषी  अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी