शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे उत्पादन घटल्यामुळे निराश शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:41 IST

राजू वाघ यांनी मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या अंगणातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

आगर (अकोला) : सततच्या नापीकी व यावर्षी कपाशीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे निराश झालेल्या उगवा येथील एका अल्पभूधारक शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. राजू मधुकर वाघ (४४) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. येथून जवळच असलेल्या उगवा येथील राजू वाघ यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती असून, गत काही वर्षांपासून ते शेतातून पुरेशा प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने चिंतीत होते. यावर्षीही शेतीवर केलेला खर्च वसूल होत नसल्याची स्थिती पाहून त्यांच्या नैराश्यात भरच पडली. अती पावसामुळे यावर्षी कपाशीचा उतारा कमी आल्यामुळे निराश झालेल्या राजू वाघ यांनी मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या अंगणातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर अकोट फैल पोलिस ठाण्यात वर्दी देण्यात आली. ठाणेदार गणेश अणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी गणेश भांडे अरूण येनकर यांनी उगवा येथे येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांत याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  राजु वाघ यांच्या पश्चात पत्नी,  एक मुलगा,  एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या