शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी परिवार संवाद दौरा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 15:50 IST

Jayant Patil News कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मूर्तिजापूर :  तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यानी संघंटीतपणे काम करण्याचे प्रयत्न करावे, कार्य कर्तव्याच्या भावना समजून घेण्यासाठी व बळ देण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रे निमित्ताने शनिवारी येथे आयोजित बैठकीत केले.          गडचिरोली पासून या परिवार संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली असून तब्बल दहाव्या दिवशी मूर्तिजापूर प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना आपल्याला आनंद होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारून बुथ, कमिट्या तयार करुन स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे आवाहन करीत आपण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तद्वतच या तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असून लवकरच त्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनी यात्रेमागची भूमिका विशद करताना, कुठलेही निमित्त नसताना ही संवाद यात्रा का काढावी लागली हे स्पष्ट केले, दरम्यान, कोणाच्याही तोंडाला मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने विदर्भात कोरोना नसल्याची फिरकी घेतली. पक्ष संघटन यादृष्टीने हा परिवार संवाद दौरा असून केंद्र शासनाचा समाचार घेताना केंद्र शासनाने अनेक चुकिचे निर्णय घेतल्याने येथील महिला सुरक्षित नसल्याची खंत उदाहरण देऊन व्यक्त केली. आमच्या पक्षात सक्षम महिला असून त्यांची ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली असल्याच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी रविकांत वरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, भैयासाहेब तिडके, बळीराम सिरसकार, हरीदास भदे, रवी राठी, संतोष कोरपे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रक्षणा सलगर, गुलाबराव गावंडे, प्रदेश प्रवक्ता आशा मिरगे, शिवा मोहोड, उज्वला राऊत, सुषमा कावरे इत्यादी उपस्थित होते. संध्याकाळी ५ वाजता नियोजीत कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरु झाल्याने उपस्थित बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMurtijapurमुर्तिजापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस