शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लष्करी’ने केला मका पिकावर हल्ला; ज्वारी, बाजरीलाही धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:33 IST

आतापर्यंत ३५ टक्क्यांच्या जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला : लष्करी अळीने मका पिकावर हल्ला केला असून, आतापर्यंत ३५ टक्क्यांच्या जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अळीची ज्वारी, बाजरी तृणवर्गीय पिकावर प्रादुर्भावाची शक्यता आहे. कापूस पिकावर अद्याप तरी नोंद नाही; परंतु शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.लष्करी अळी (फॉलआर्मीवर्म) ही मूळची संयुक्त राज्य ते अर्जेंटिनापासून पसरलेल्या दक्षिण गोलार्धातील उष्ण कटिबंधीय प्रदेशातील आहे. उन्हाळ्यात या अळीचे पतंग ३६०० किलोमीटरचे अंतर ३० तासात कापून स्थलांतर करतात. त्यामुळे यांचा प्रसार झपाट्याने होेतो. गतवर्षीच्या जून-जुलै महिन्यात तामिळनाडू व कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत या अळीची प्रथमच नोंद झाली. आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून प्रवास करीत ही अळी महाराष्ट्रात पोहोचली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सप्टेंबर महिन्यात या अळीची प्रथम नोंद घेण्यात आली. सांगली, सातारा, पुणे, नांदेड, हिंगोली तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या माळेगाव (गोंड) येथील मका पिकावर मोठ्या प्रमाणात ही अळी आढळून आली. या अळीने माळेगावातील आठ एकर मका उद्ध्वस्त करू न टाकला होता.आता महाराष्टÑाच्या इतरही भागात प्रसार होत असून, बहुभक्षीय असलेली ही अळी ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर आपली उपजीविका करते. गवतवर्गीय पीक हे या अळीचे सर्वात आवडते खाद्य आहे. ही अळी पिकावर सैन्यासारखी चाल करू न समोर येणारी सर्व वनस्पती फस्त करते. सध्या राज्यातील मका, ज्वारी, बाजरी पिकांवर तिने बस्तान मांडले आहे. मका पिकाचे तर सरासरी ३५ ते ४० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कपाशीवरसुद्धा ही अळी येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कापूस पिकाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

मका पिकावर ही अळी आली आहे. विदर्भात सुरुवातीला नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कापूस पिकावर अद्याप तरी या अळीची कोणतीही नोंद आढळली नाही.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,कीटकशास्त्र विभाग,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी