शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरी रोखण्यात अपयश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:11 IST

कारवाई करण्याच्या कामात जिल्ह्यातील तालुका स्तरावरील महसूल विभागाच्या पथकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे.

 - संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव अद्याप रखडला असून, लिलाव न झालेल्या घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळू चोरीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांदी होत असून, शासनाचा महसूल बुडत असताना वाळू चोरी रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या कामात मात्र जिल्ह्यातील महसूल विभागाच्या तालुकास्तरीय पथकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे.शासनामार्फत नवीन वाळू धोरण ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र जानेवारी उलटून गेला तरी जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव अद्याप करण्यात आला नाही. गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या वाळूघाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली असून, वाळूघाटांचा लिलाव अद्याप रखडला असताना, लिलाव न झालेल्या वाळूघाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मात्र जोरात सुरू आहे. वाळू चोरीच्या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांदी होत असून, वाळूच्या स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाला तिजोरीत जमा होणारा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. लिलाव न झालेल्या वाळूघाटांमध्ये अवैध उत्खनन, अवैध वाहतूक आणि वाळू चोरीचे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या कामात जिल्ह्यातील तालुका स्तरावरील महसूल विभागाच्या पथकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळूघाटांमधील वाळूची चोरी केव्हा थांबणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.१५ वाळूघाटांच्या लिलावासाठी पर्यावरण समितीची परवानगी बाकी!जिल्ह्यातील अकोला तालुक्यात-३, बाळापूर तालुक्यात-५, तेल्हारा तालुक्यात-२ व मूर्तिजापूर तालुक्यातील ५ अशा १५ वाळूघाटांच्या लिलावासाठी निर्धारित किमतीच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांकडून ३ फेबु्रवारी रोजी मान्यता देण्यात आली आहे; परंतु या वाळूघाटांच्या लिलावासाठी राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीची परवानगी मिळणे अद्याप बाकी आहे.

जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये अवैध उत्खनन, अवैध वाहतूक व वाळू चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावरील पथके कार्यक्षम करून, कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आले आहेत.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग