शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:06 IST

अकोला : कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून ...

अकोला: कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कासवगतीनेच सुरू असल्यामुळे शेतकºयांमधील नैराश्य वाढतेच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अकोला जिल्ह्याची आकडेवारी तपासली असता जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल ११८ शेतकऱ्यांनी गळफास आवळला आहे. नापिकी, कर्जबाजरीपणा व शेतमालाचा कमी भाव प्रामुख्याने या तीन कारणांमुळेच आत्महत्या झाल्याचे सरकारी दप्तरात नोंदविलेले आहे. नापिकीला लहरी निसर्ग, शेतमालाच्या कमी भावाला सरकारी धोरण कारणीभूत आहे, तसेच कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी दिलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची संथ गती आत्महत्यांसाठी जबाबदार ठरली आहे.अपुऱ्या व लहरी पावसामुळे दुष्काळ आणि नापिकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. भाजपा सरकारने कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली; मात्र या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्याच आहेत. विशेष म्हणजे, गत वर्षभरात झालेल्या ११८ आत्महत्यांमध्ये ६६ शेतकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या असून, ३१ आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत. तब्बल २१ आत्महत्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या आत्महत्यांची वाढती संख्या व कर्जमाफ ीच्या अंमलबजावणीची स्थिती यांचे प्रमाण पाहिले असता अंमलबजावणीमधील अपयश अधोरेखित होते. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, नऊ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची योजना आणली. सारे सोपस्कार पार पाडून योजना तयार झाली, घोषित झाली; मात्र अंमलबजावणी करणाºया यंत्रणेमुळे ही योजना सपशेल अपयशी ठरल्याने शेतकºयांमधील नैराश्य कायम असून, त्याचाच परिणाम आत्महत्यामध्ये वाढ होण्यात झाली आहे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या