शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

फडणवीस सरकार सेनेच्या नव्हे, तर राष्ट्रवादीच्या सम र्थनावर टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:49 IST

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. 

ठळक मुद्देखासदार नाना पटोले जनतेची घुसमट होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. दररोज होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या भयावह आहेत.  शासनाकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाही.  त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली  आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; परंतु ती  देताना कर्जमाफीच्या अर्जात जाचक अशी ६६ कलमे  लादली. १ कोटी ३४ लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले.  त्यातही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील १0 लाख शेतकरी  बोगस असल्याचे म्हणतात, असे सांगत खासदार नाना  पटोले यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना, त्यांच्यावर  जाचक अटी लादल्या जातात आणि दुसरीकडे केंद्र शासन  अदानीचे ७९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, हे ख पवून घेतल्या जाणार नाही. आम्ही २0२२ ची वाट पाहणार  नाही. शेतकर्‍यांबाबत केंद्र शासनाने २0१९ पर्यंतच सकारा त्मक निर्णय घ्यावा, असेही खा. पटोले म्हणाले. पक्षात  तुमची घुसमट होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना खा. पटोले  यांनी मी काँग्रेसमध्ये होतो, तेव्हाही घुसमट झाली नाही आणि  आता भाजपातही माझी घुसमट होत नाही, असे स्पष्ट करीत  त्यांनी जनतेची घुसमट होत आहे. जनतेच्या समस्या  मांडण्यासाठी मी निवडून आलो, त्या मांडण्याचा मी प्रयत्न  करतो आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी  सरकार स्थापन झाले. आंध्र सरकारने तीन वर्षांत  जलसिंचनाची व्यवस्था केली; परंतु आमचे सरकार तापी व  गोदावरी खोर्‍याचा विकास करून जलसिंचनाची व्यवस्था  करू शकले नाही, असा आरोपही खासदार पटोले यांनी  केला. तसेच शेतकर्‍यांच्या मुद्दयावर आपण खासदारकीदे खील सोडायला तयार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला  शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे,  ज्ञानेश्‍वर सुलताने, मनोज तायडे, विजय देशमुख आदी उ पस्थित होते.

कृषी विद्यापीठे राजकीय अड्डेल्ल राज्यातील कृषी विद्यापीठांकडून शेती आणि शेतकर्‍यांचा  विकास अपेक्षित आहे; परंतु कृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती  ठरताहेत. राज्यात कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांचे भले  होत नाही. त्यांच्यासाठी दर्जेदार बियाणे तयार होत नाहीत.  संशोधन होत नाही. कृषी विद्यापीठे राजकीय अड्डे बनली  आहेत. कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर केली जात नाही, तर  ती जातीच्या आधारावर केली जात असल्याचा आरोपही  खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत  केला.