शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:14 IST

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शासनाच्या स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणासाठी घेण्यात येणाºया उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविणे आवश्यक आहे. तथापि, ३० जून २०१९ नंतर टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून टंचाई अंतर्गत घेण्यात येणाºया उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश देत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पाणीटंचाई निवारणासाठी विहीर, तलाव उद्भवावरून पाणीपुरवठा करण्याकरिता डीझल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डीझलचा खर्च टंचाई निधीतून करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.‘सीईओं’ना १५ जुलैपर्यंत निवीदा स्वीकृतीचे अधिकार!पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना आणि नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती या उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दरसूचीनुसार मूल्यांकित किमतीपेक्षा १० टक्क्यापर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) देण्यात आले आहेत. ‘सीईओं’ना देण्यात आलेले हे अधिकार येत्या १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.चारा छावण्यांना १ आॅगस्टपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा!चारा छावण्यांतील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा येत्या १ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई