शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष देऊन युवतीचे शोषण; पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:33 IST

अकोला: वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने सिव्हिल लाइन्स परिसरात रहिवासी असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उजेडात आली.

अकोला: वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने सिव्हिल लाइन्स परिसरात रहिवासी असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दीपक निंबाळकर नामक पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दीपक शालीग्राम निंबाळकर (३७) याचा आधीच विवाह झालेला असताना तसेच त्याला एक मुलगा असताना त्याने अकोल्यातील जठारपेठ परिसरातील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दिले. अविवाहित असल्याचे सांगून तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी केली. प्रेमसंबधातच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे वारंवार आश्वासन या पीएसआयने तीला दिले. लग्नाचे आमिष दिल्यानंतर पीएसआयने २७ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केले. सप्टेंबर २०१७ पासून हा पोलीस उपनिरीक्षक या युवतीचे लैंगिक शोषण करीत असल्याचे तक्रारीत नमूद असून, त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पीएसआय दीपक निंबाळकर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ४१७ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीदेखील एका पीसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही पोलीस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याने अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कठारे कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गुडधी, नाशिक व शेगावात केले शोषण

जठारपेठ परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. या युवतीचे लग्न झाल्यानंतर २००८ मध्ये तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर याने तिच्या मोबाइलवर संपर्क साधून मैत्री केली. तिचा वाढदिवस असताना गुडधी परिसरातील एका निर्जन स्थळी नेऊन कारमध्ये जबरी संभोग केला होता. त्यानंतर नाशिक येथे त्याचे प्रशिक्षण सुरू असतानाही महिलेला हॉटेलवर ठेवून बलात्कार केला. महिलेने लग्नाची मागणी केली असता, त्याने विरोध केल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिव्हिल लाइन्स पोलिसांची टाळाटाळसिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. यापूर्वीदेखील चोरी , महिला व युवतींच्या छेडखानी प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचे वास्तव आहे; मात्र महिलेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारPoliceपोलिस