लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सौर पथदिव्यांचा संबंधित गावांमध्ये काहीच उपयोग नाही. पुरवठादाराने पथदिवे लावल्यापासूनच बंद आहेत. पळसो येथील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यासाठी सहा महिन्यात सातत्याने तक्रारी केल्या, त्यावर काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. पथदिव्यांचा उपयोग न होताच लाखो रुपयांचा खर्च झाला. तो वाया जात आहे, त्यापेक्षा योजना न राबवलेलीच बरी, अशी मानसिकता आता ग्रामस्थांची झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आणि माहिती मिळण्यासाठी दाखल अपिलावर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव भा.र. गावित यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानुसार दिलेल्या आदेशातील माहितीतून सौर पथदिवे लावण्यातील संपूर्ण घोळ उघड होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सौर पथदिवे लावण्याची प्रक्रिया, निविदा, अंदाजपत्रके, ग्रामपंचायतींचे ठराव, गावातील दिव्यांची संख्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची तांत्रिक, प्रशासकीय मान्यता, प्रत्येक दिव्यांची किंमत, त्यासाठी केंद्र, राज्य शासनाने दिलेला निधी, जिल्ह्यात योजनेवर झालेला खर्च, दिवे पुरवठादाराची यादी, करारनामा, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी, तसेच सौर पथदिवे बंद असल्याची कारणे, याबाबत संपूर्ण माहिती मिळाल्यास मोठा घोळ उघड होणार आहे, असे तक्रारकर्ते जामनिक आणि पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळेच गटविकास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत टाळाटाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पळसो गावातील तक्रारी बेदखल पळसो बढे येथील सौर पथदिव्यांची सहा महिन्यांपूर्वी तीन वेळा आॅनलाइन तक्रार केली. त्यावर माणूस पाठवतो, असे सांगितल्यानंतरही माणसाचा पत्ता नाही, त्यामुळे सरकारी पैशाची अशी उधळपट्टी होत असेल, तर त्या योजनाच नको, असे मत पळसो बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य हितेश जामनिक व परमेश्वर पवार यांनी व्यक्त केले.
चौकशीतून उघड होणार निधीचा अपव्यय!
By admin | Updated: May 15, 2017 02:10 IST