शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील शेतकऱ्याचा काजू उत्पादनाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:33 IST

अकोला: अठ्ठेचाळीस अंश सेल्सीअस तापमान असलेल्या अकोला परिसरात काजू उत्पादन करण्याचा अभिनव प्रयोग येथील प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी यशस्वी केला आहे.

- संजय खांडेकर

अकोला: अठ्ठेचाळीस अंश सेल्सीअस तापमान असलेल्या अकोला परिसरात काजू उत्पादन करण्याचा अभिनव प्रयोग येथील प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी यशस्वी केला आहे. काजूसाठी दमट आणि थंड हवामान आवश्यक असतानाही चांडक यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर आता ते काजूची शेती करण्याच्या तयारीत आहे.पंधरा दिवसांआधी अकोला एमआयडीसी असोसिएशनच्या पुढाकारात अन्न प्रक्रिया या संदर्भात कार्यशाळा झाली. कास्तकारांनी परंपरागत शेतीसोबतच बदल आणि अन्न प्रक्रिया साखळीचे उद्योग निवडले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी ही कार्यशाळा घेतली गेली. त्यामध्ये कुंभारी येथील सधन आणि प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी हजेरी लावली. शेतात पिकविलेले ओले काजू त्यांनी या कार्यशाळेत आणले. हा प्रयोग अकोला परिसरात झाला यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता, अखेर एका चमूने कुंभारीच्या शेतात भेट देऊन काजू उत्पादनाची पाहणी केली. त्यानंतर या चमूने चांडक यांना हा प्रयोग कसा यशस्वी केला, याबाबत विचारणा केली असता, चांडक यांनी अभिनव प्रयोगाची माहिती सांगितली. तीन वर्षांपूर्वी चांडक कोकणात गेले होते. येथून त्यांनी केसर आणि काजूची रोपे सोबत आणली. त्यांनी कुंभारी येथील शेतात या रोपांची लागवड केली. गत दोन वर्षांपासून या रोपांना नियमित काजू लागत आहेत. काजूसाठी दमट आणि थंड हवामान आवश्यक असते. आपल्याकडील उष्ण कटिबद्ध परिसरात, कृत्रिम पद्धतीचे वातावरण निर्मिती करून काही रोपे जगविता येऊ शकतात; मात्र कोकण परिसरासारखे मोठ्या प्रमाणात पीक आपल्याकडे घेणे अशक्य आहे.-डॉ. सुभाष टाले, जल व कृषी तज्ज्ञ. अकोला. कुंभारी परिसरात माझी १८ एकर मुरमाळ जमीन आहे. गत अनेक वर्षांपासून मी सेंद्रिय पद्धतीचे पीक घेत असून, डाळिंबची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या शेतातील डाळिंबांना मोठी मागणी आहे. यासोबतच काजू, केसर आंबा, आवळा, मोसंबी, संत्रे, चिक्कू, सीताफळ, रामफळ आदी फळ लागवडीचे प्रयोग मी सातत्याने करीत आहे.-द्वारकादास चांडक, शेतकरी-उद्योजक, कुंभारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी