शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

महावितरणचा प्रभारी कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळय़ात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:20 IST

वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणार्‍या महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी  गोरक्षण रोड स्थित त्याच्याच कार्यालयात सापळा रचून रंगेहात अटक केली. 

ठळक मुद्दे२४ दिवसांत अडकला दुसरा अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणार्‍या महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी  गोरक्षण रोड स्थित त्याच्याच कार्यालयात सापळा रचून रंगेहात अटक केली. अकोला येथील एका ४२ वर्षीय उप-कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून ‘एसीबी’ने शुक्रवारी हा सापळा रचला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने २४ दिवसांपूर्वीच ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्वीकारला होता. या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजुरी देण्याकरिता तसेच मागील सात दिवसांत बाळापूर, बाश्रीटाकळी उपविभागातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपासाठी वीज जोडणीकरिता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरिता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १0 हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप-कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती. एसीबीने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या तक्रारीची पडताळणी  केली. त्यानंतर गोरक्षण रोड स्थित कार्यकारी अभियंता कार्यालयात शुक्रवारी दुपारी १.१५ मिनिटांनी सापळा रचण्यात आला. यावेळी जानोकार याने कंत्राटदाराकडून रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या अधिकार्‍यांनी झडप घालून जानोकारला ताब्यात घेतले. जानोकारकडून लाचेपोटी स्वीकारलेली १0 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याला अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस उप-अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

२४ दिवसांत अडकला दुसरा अधिकारीमहावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदाराकडून ५0 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर उंबरकर याला २२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मूळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन जानोकार याला त्याच दिवशी अकोला ग्रामीण विभागाचा प्रभार सोपविण्यात आला होता. पदभार स्वीकारल्याच्या २१ व्या दिवशी गजानन जानोकार हादेखील लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या जाळय़ात अडकला.

टॅग्स :Crimeगुन्हा