संचारबंदीतून कृषी यंत्रे, चहापत्ती उद्योगांना वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:41 AM2020-04-05T10:41:35+5:302020-04-05T10:41:41+5:30

संचारबंदीतून शेतीसाठी लागणारी यंत्रे व त्यांचे सुटे भाग विक्रेते आणि चहापत्ती उद्योग व विक्रेत्यांना वगळण्यात येत असल्याचा आदेश जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला.

Excludes agricultural machinery, tea industry from communication block! | संचारबंदीतून कृषी यंत्रे, चहापत्ती उद्योगांना वगळले!

संचारबंदीतून कृषी यंत्रे, चहापत्ती उद्योगांना वगळले!

Next

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीतून शेतीसाठी लागणारी यंत्रे व त्यांचे सुटे भाग विक्रेते आणि चहापत्ती उद्योग व विक्रेत्यांना वगळण्यात येत असल्याचा आदेश जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळून इतर दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, अमलात असलेल्या संचारबंदीतून कृषी यंत्रांची दुकाने, यंत्रांचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने तसेच चहापत्ती विक्रेते व उद्योगांना वगळण्यात येत आहे. संबंधित उद्योग व्यावसायिकांनी त्यांच्याकडे कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवावे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्याची हाताळणी करणारे कर्मचारी-कामगारांना मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटाझर व इतर प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे व त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राखण्यात यावे, पाच किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी-कामगार एकत्र येऊन काम करणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घेण्यात यावी, यासोबतच कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि त्यांना अन्न व इतर आवश्यक साहित्य सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ४ एप्रिल रोजी दिला.


चहाटपºया सुरू ठेवण्यास मनाई कायम!
शेतीसाठी लागणारी यंत्रे तसेच चहापत्ती उद्योग व विक्रेत्यांना संचारबंदीतून वगळ्ण्यात आले असून, चहा स्टॉल, सुरू ठेवण्यास मनाई कायम असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

 

Web Title: Excludes agricultural machinery, tea industry from communication block!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला