शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरानजीक मातीचे उत्खनन; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:14 IST

पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे  उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअवैध पावतीवर गायरानातील मातीची वाहतूक माती उत्खननाचे आजपासून मोजमापप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे  उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्खननानंतर अवैध पावतीवर मातीची वाहतूक करून शासनाची फसवणूक केल्याने राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीच्या सुरपरवायझरसह चौघांविरुद्ध गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८  व ३९ मधील सरकारी जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. पुणे येथील राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत गायरान जमिनीवरील मातीचे उत्खनन करण्यात येत असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट खोल मातीचे उत्खनन करण्याची र्मयादा असताना, त्यापेक्षा जास्त खोल मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत आहे. यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गायरानातील माती उत्खननाची चौकशी २८ नोव्हेंबरपासूनच जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांमार्फत सुरू करण्यात आली. या चौकशीमध्ये उत्खननानंतर मातीची वाहतूक अवैध पावतीवर करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीचे चार ट्रक जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा भंग करून , माती वाहतुकीच्या परवाना पावतीमध्ये तारीख व वेळ याबाबतच्या उल्लेखात खाडाखोड करून, मातीची वाहतूक करीत शासनाची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राइट इन्फ्रास्टक्शन  कंपनीच्या  सुपरवायझरसह ट्रक चालक दादाराव गजानन सावंग (२४), सुरेश सीताराम कासदे (२४) व मनोज हसदा इत्यादी चौघांविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात भांदवि  ३२0, ४६८, ४७१ (३४ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार झाले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

माती उत्खननाचे आजपासून मोजमापशिलोडाजवळील गायरान जमिनीवरील अवास्तव माती उत्खननाच्या चौकशीत माती उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. महसूल अधिकार्‍यांसह अभियंत्यांचा समावेश असलेल्या या पथकामार्फत शुक्रवारपासून माती उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRailway Passengerरेल्वे प्रवासी