शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा - पुरुषोत्तम रुपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:58 IST

शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला  यांनी दिले.

अकोला :  जिल्ह्यातील शेती ही खारपाणपट्याची असून या सर्व शेतीचे मृदा आरोग्य पत्रिका (soil health card mission ) योजने अंतर्गत शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला  यांनी दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासन म्हणून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन ना.पुरुषोत्तम रुपाला यांनी केले.

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, व युपीएल च्या वतीने आयोजित शासकीय अधिकारी,किटकनाशक उत्पादक व शेतकरी यांची आढावा बैठक व शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ दिलीप मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड,आमदार गोवर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, कृषी अधीक्षक मोहन वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, युपीएलचे रज्जूभाई श्रॉफ, सॅन्ड्रा श्रॉफ, अजित कुमार, समीर टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. रूपाला पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीतील खर्च कमी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होईल, यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती,नवतंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.शेतीच्या विविध प्रयोगासाठी लागणारी यंत्रे अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

यावेळी केंद्रीय कृषि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला तर शेतकऱ्यांनी शेतातील प्रयोगाबाबत आपले अनुभव कथन केले.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी