प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा! - पालकमंत्र्यांनी केले आवाहन, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:41 PM2018-01-20T18:41:11+5:302018-01-20T18:42:50+5:30

अकोला: अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले.

Everybody should make the donation of blood! - Guardian Minister's Appeal | प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा! - पालकमंत्र्यांनी केले आवाहन, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा! - पालकमंत्र्यांनी केले आवाहन, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Next
ठळक मुद्देजिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरा रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळपर्यंत ५०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.पालकमंत्री यांनी यावेळी रक्तदात्यांची भेट घेउन रक्तदान केल्याबदल त्यांचे कौतुक केले.

अकोला: मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे रक्ताची गरज मानवी रक्तानेच भागवावी लागते. रक्ताची गरज उपलब्धता यामध्ये तफावत असल्यामुळे प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शनिवारी येथे केले.
अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरा रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळपर्यंत ५०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रास आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार हरिष पिंपळे , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकते, माजी आमदार नारायन गव्हाणकर, माजी आमदार तुकाराम बिरकड, नगरसेवक गोपी ठाकरे, डॉ. पुरुषोत्त तायडे, डॉ. अभय जैन, डॉ.प्रशांत अग्रवाल, डॉ.प्रकाश उमप, डॉ.दिलीप सराटे, डॉ. श्रीराम चाफे, डॉ.संजय धोत्रे, डॉ. नामधारी, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, गोपाल खंडेलवाल, श्रीकांत पीसे आदिंची उपस्थीती होती.
रक्तदान हे महादान असल्याचे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वापचार रुग्णालयात हजारो रुग्ण भरती होतात. यापैकी अनेकांना रक्ताची गरज असते.रक्ताची गरज व उपलब्धता यामध्ये तफावत असल्यामुळे गरीब रुग्णांच्या नोवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. तसेच अपघात, शस्त्रक्रिया, कमी वजन असलेले बालक, हिमोफीलीया व थॅलसीमीया या सारख्या रक्तासबंधी आजारासाठी रक्ताची आवश्यकता असते.म्हणुन प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री यांनी यावेळी रक्तदात्यांची भेट घेउन रक्तदान केल्याबदल त्यांचे कौतुक केले.

Web Title: Everybody should make the donation of blood! - Guardian Minister's Appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.