शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

आदेशानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:49 IST

शिक्षकांना शाळेत रुजू होण्याचा आदेशसुद्धा देण्यात आल्यानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अकोला: जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील ६२ अतिरिक्त शिक्षकांची रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. या शिक्षकांना शाळेत रुजू होण्याचा आदेशसुद्धा देण्यात आल्यानंतरही अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजूच झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेक अतिरिक्त शिक्षकांचे ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आल्याने, ते शाळांमध्ये रुजू होत नसल्याचे दिसत आहे.शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ६२ अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन केले. दोन दिवसात त्यांना शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेशपत्रसुद्धा दिले. ६२ अतिरिक्त शिक्षकांपैकी शहरातील शाळांमध्ये समायोजन झालेले शिक्षक शाळांमध्ये रुजू झाले; परंतु अनेक अतिरिक्त शिक्षकांना ग्रामीण भागातील शाळांमध्ये करण्यात आलेले समायोजन पसंतीस पडले नाही. काही शिक्षक ग्रामीण भागातील शाळांमध्ये गेले तर त्यांना शाळा रुजू करून घेत नसल्याच्या तक्रारी शिक्षक करू लागले आहेत. यासोबतच समायोजन करताना, काही शाळांमध्ये बीएससी बीएडऐवजी डीएड शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्यामुळे शाळांकडून डीएड शिक्षक नको तर बीएससी शिक्षक पाहिजे. असल्याची मागणी समोर आली. त्यामुळे काही डीएड शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे आता ज्या शाळांमध्ये बीएससी शिक्षक देऊन डीएड शिक्षकांना इतर शाळांमधील रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे. ज्या शाळा रुजू घेण्यास अतिरिक्त शिक्षकांना नकार देत आहेत, त्या शिक्षकांचेसुद्धा इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यामुळे अर्धेधिक अतिरिक्त शिक्षक अद्याप शाळांमध्ये रुजू झाले नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकSchoolशाळा