शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 15:09 IST

पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देअकोला पश्चिममध्ये सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज काँग्रेसकडे आले आहेत.काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अकोला: अकोला जिल्ह्यात भाजापाने निर्माण केलेल्या झंझावातापुढे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला उभारी मिळण्याची एकही संधी मिळत नाही. लोकसभेसह विधानसभेत सातत्याने काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अपेक्षित यश मिळण्याऐवजी आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तिकीट मिळविण्यासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात उतरले आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना देवडिया काँग्रेस भवनातून ५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित अर्ज आवश्यक दस्तावेज व १५ हजार रुपये शुल्कासह प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील कार्यालयात जमा करायचे आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असताना विधानसभा निवडणुकीसाठी फारसे कुणी इच्छुक असणार नाहीत, अशी शक्यता वाटत होती; मात्र जय-पराजयाची पर्वा न करता काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे.राष्टÑवादीकडे असलेल्या अकोला पश्चिममध्ये सर्वाधिक दावेदारीअकोला पश्चिम व मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. आताही या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाही काँग्रेसच्या इच्छुकांनी या मतदारसंघांसाठीही पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांची गर्दी आहे. अकोला पश्चिममध्ये सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. अल्पसंख्याकांची मोट बांधण्यासाठी मोर्चेबांधणीविधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी विविध राजकीय पक्षांकडून अल्पसंख्याक मतदारांची मोट बांधाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोल्यात राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याक मेळाव्यासाठी तर सपातर्फे १४ जुलै रोजी आमदार अबू आझमी यांची सभा घेण्याबाबत प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.बॉक्स....अकोला पूर्व-०३मूर्तिजापूर-०३अकोट-१०बाळापूर-१२अकोला पश्चिम-१३

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAkolaअकोला